नेदरलँड्सची डच संघावर मात

। हॅम्बर्ग । वृत्तसंस्था ।

बदली खेळाडू (सुपर सब) वाऊट वेहॉर्स्टने सामन्यातील सात मिनिटे असताना केलेल्या शानदार गोलच्या बळावर माजी विजेत्या नेदरलँड्सने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. ‘ड’ गटातील या लढतीत त्यांनी पोलंडवर पिछाडीवरून 2-1 फरकाने मात केली.

प्रशिक्षक रोनाल्ड कोएमन यांनी सामन्याच्या 81व्या मिनिटाला वेहॉर्स्ट याला मैदानात उतरविले आणि 31 वर्षीय खेळाडूने विश्‍वास सार्थ ठरविताना नेदरलँड्सला 83व्या मिनिटास ‘फर्स्ट टच’वर 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. नॅथन अके याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर बदली खेळाडूने पोलंडच्या गोलरक्षकाला चकवा दिला. त्यापूर्वी, अ‍ॅडम बुक्सा याने शानदार हेडिंग साधत पोलंडला 16व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली होती. नेदरलँड्सने 29व्या मिनिटाला बरोबरी साधली. कोडी हकबो याने पोलंडच्या बचावफळीला चकवा देत डच संघाला बरोबरी साधून दिली. यावेळी चेंडू पोलंडच्या बार्टोझ सालामॉन याला आपटून गोलनेटमध्ये गेला.’ड’ गटात आता पुढील लढतीत 21 जून रोजी पोलंडसमोर ऑस्ट्रियाचे आव्हान असेल, तर 22 जून रोजी नेदरलँड्स फ्रान्सविरुद्ध खेळेल.

Exit mobile version