| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकात अप मार्गावर नवीन पादचारी पूल उभारला जात आहे. भिसेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट स्थानकाबाहेर उतरता येणार आहे. मात्र, त्या नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी तेथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पुलाचा काही भाग तोडला जाणार आहे. दरम्यान, नवीन पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पादचारी पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात नवीन मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे अप मार्गावर साधारण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्या मार्गिकेच्या भागात मुंबई दिशेकडे असलेला पादचारी पुलाचा काही भाग अडचणीचा ठरत आहे. सध्या वापरात असलेल्या त्या पादचारी पुलाच्या एका भागातून ही मार्गिका पुढे जाणार आहे. त्या नवीन मार्गिकेचे पुणे भागाकडून काम पूर्ण होत आले आहे. मात्र, त्या मार्गिकेच्या मार्गात कर्जत स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा काही भाग आणि पुढे असलेले तिकीट घर अडथळा ठरत आहे. त्यामुळे आता भिसेगावकडे उतरणारा नवीन पादचारी पूल बांधला जात आहे. सध्याच्या मुंबई दिशेकडे असलेल्या त्या पादचारी पुलावरूनच हा नवीन पादचारी पूल जोडला जात आहे. त्या नवीन पादचारी पुलाचा एक भाग कर्जत भिसेगाव या भागाकडे उतरणार असून दुसरा भाग हा कर्जत रेल्वे स्थानकातील ई एम यू फलाट तसेच फलाट तीन साठी जोडला जाणार आहे.
कर्जत स्थानकात नवीन पूल
