चिखली प्रा.आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे आज लोकार्पण

| अलिबाग | प्रतिनिधी |
चिखली,ता.अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन वास्तूचे लोकार्पण सोमवारी(21 फेब्रुवारी) आम.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री अदिती तटकरे,जि.प.अध्यक्षा योगिता पारधी,खा.सुनिल तटकरे, आम.बाळाराम पाटील,निरंजन डावखरे,अनिकेत तटकरे, महेंद्र दळवी, माजी आ.पंडित पाटील,उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती अ‍ॅड.निलिमा पाटील,दिलीप भोईर, गीता जाधव, बबन मनवे,सदस्या चित्रा पाटील,पक्षप्रतोद अ‍ॅड.आस्वाद पाटील,विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस पक्षप्रतोद बाजीराव परदेशी,शिवसेना प्रतोद मानसी दळवी, भाजप प्रतोद अमित जाधव,राष्ट्रवादी प्रतोद बबन चाचले,अलिबाग पं.स.सभापती प्रमोद ठाकूर,कुसुंबळे सरपंच मीना लोभी,जि.प.सीईओ डॉ.किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे,ग्रा.पं.सदस्य उत्तम पाटील आदी उपस्थित राहणार असल्यााची माहिती प्रभावी बीडीओ ज्ञानेश्‍वर साळावकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित घासे यांनी दिली.

Exit mobile version