द्रोणागिरी गडावर नवी कचराकुंडी

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील ऐतिहासिक द्रोणागिरी गड परिसरात स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. गडावरील जुनी कचराकुंडी खराब झाल्यामुळे परिसरात कचरा विखुरलेला दिसत होता. यामुळे गडाचे सौंदर्य बाधित होत होते. या पार्श्वभूमीवर द्रोणागिरी ट्रेकर्सच्या पुढाकारातून नव्याने जाळीयुक्त कचराकुंडी बसविण्यात आली. हा उपक्रम ट्रेकर्स राजा गोवारी यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास गेला. बुधवारी (दि.18) सकाळी गडावर ही कचराकुंडी बसविण्यात आली. यावेळी नरेश रहालकर, दिनेश पाटील, रमेश म्हात्रे, राजा गोवारी, बाळू, सतीश गवई, आतिष पाटील, अभिजित ठाकूर, बाबू बंडा, जितेंद्र पाटील आदी ट्रेकर्स उपस्थित होते. बसविण्यात आलेली कचराकुंडी जाळीयुक्त असून ती भरल्यानंतर फिरविल्यास कचरा बाहेर पडेल, अशी सोय करण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांनी कचरा इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकावा, असे आवाहन द्रोणागिरी ट्रेकर्सतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version