आजपासून नवे निर्बंध; विवाह सोहळ्यासाठी 50, अंतिम विधीसाठी 20

। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने तातडीने कार्यवाही करीत नवीन निर्बंध लागू केले.त्या निर्बंधांच्या सावटातच शुक्रवारी मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.नव्या निर्बंधांमुळे सार्‍यांनाची धास्ती वाढली असून,रुग्ण वाढल्यास सरकारनेही निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे. नव्या निर्बंधामुळे यावर्षीही नव्या वर्षाचे स्वागत घरातच राहून करावे लागले. रीही अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.त्यांना आहे त्या ठिकाणीच राहणे भाग पडले.सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी जारी करण्यात आल्याने यावेळीही गर्दीची ठिकाणे ओस पडली होती.ऐन सिझनमध्ये कोरोना वाढल्याने व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पुन्हा लॉकडाऊन?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याविषयी अद्याप राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करताना शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची गरज याचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

शाळा पुन्हा बंद होणार?
अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यात जवळपास दीड वर्षानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र, करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका या पार्श्‍वभूमीवर शाळा पुन्हा बंद कराव्यात का? यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्ता लगेचच शाळा बंद करू नयेत शाळांमध्ये लसीकरण सुरू करावे.-उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.-जय वडेट्टीवार,मंत्री

देशात 16 हजार रुग्ण वाढले
केंद्र सरकारने शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या 24 तासांत एकूण 16 हजार 764 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातला ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता 1270 झाला आहे. 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सध्या असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सध्या असलेल्या अ‍ॅक्टिव्ह ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 1270 असून त्यात सर्वाधिक 450 ओमायक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल 320 दिल्लीत, 109 केरळमध्ये तर 97 बाधित गुजरातमध्ये आहेत.

Exit mobile version