मुरुडमधील घरांचे नव्याने सर्वेक्षण

Exif_JPEG_420

सहकार्य करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड जंजिरा नगरपरिषद हद्दीमधील असलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. त्यानुसार मुरुड नगरपरिषदेच्या हद्दीतील जुन्या मालमत्तांच्या करांमध्ये कोणतीही वाढ होणार नसून, त्याच मालमत्तेवर जर नवीन बांधकाम आढळल्यास त्याच्यावर नव्याने कर आकारणी केली जाणार आहे.
मुरुड नगरपरिषद हद्दीतील सर्व घरांचे मोजमाप करण्यात येत आहे. यासाठी नगरपरिषदेने तीन पथकांची नियुक्ती केली असून, घरोघरी जाऊन हे पथक घरांच्या मोजमापाच्या नोंदी घेत असून, नगरपरिषद कर्मचार्‍यांना घराच्या मोजमापणीकरीता सहकार्य करावे असे आवाहन मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version