| अलिबाग | वार्ताहर |
मागील काही दिवस कनकेश्र्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर रात्रीच्या अंधारात चाबूक अथवा लोखंडी रॅाडनी लोकांवर हल्ला होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता कार्लेखिंड येथे अॅक्टीव्हा एमएच ०६ सीएफ ०१८८ ही गाडी सिटल व लोखंडी रॅाडची चोरी करताना आढळून आली. या चोरीत आढळून आलेल्या चार ते पाच इसमांचा नागरीकांनी पाठलाग केला असता ते पळून गेले आहेत.
तर, सदरील अॅक्टीव्हा एमएच ०६ सीएफ ०१८८ ही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
तसेच मागील काही दिवसांपासून अलिबागमध्ये सुरू असलेल्या चाबूक हल्ला प्रकरणाचा या चोरीशी संबंध असून या चोरीच्या हेतूने हल्ला करणारी टोळी दहशत पसरविण्याचे काम करत असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.