नवदाम्पत्याला सरकारकडून मिळणार अनोखे गिफ्ट

। भुवनेश्‍वर । वृत्तसंस्था ।

वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी ओडिसा सरकारने आता नवविवाहित जोडप्यांना भेट म्हणून कुटुंब नियोजन किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये कंडोमसह कुटुंब नियोजनाशी निगडित अन्य गोष्टींचा समावेश असेल राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत सुरू करण्यात येत असलेल्या नवीन उपक्रम योजनेचा उद्देश तरुण जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पद्धतींबद्दल शिक्षित करणे आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे.

या किटमध्ये कुटुंब नियोजनाच्या पद्धती आणि त्याचे फायदे, विवाह नोंदणी फॉर्म, कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या यांची माहिती देणारे पुस्तक असेल. याशिवाय भेट दिलेल्या किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, नेल कटर, आरसा देखील असेल.

या योजनेची माहिती देताना कुटुंब नियोजन संचालक डॉ.बिजय पाणिग्रही म्हणाले की, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेवक नवविवाहित जोडप्यांना किटचे वाटप करणार असून ते यावर्षी सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात करणार आहेत. या कामासाठी आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जात आहे, जेणेकरुन ते लोकांना यासंबंधी योग्यरित्या जागरूक करू शकतील,असा दावा करण्यात आला आहे.

Exit mobile version