न्हावा-शेवा वाहतूक पोलीसांची टोचन गाडी बंदावस्थेत

। जेएनपीटी । वार्ताहर ।
न्हावा-शेवा वाहतूक पोलीस शाखेची टोचन गाडी गेली तीन महिने बंद पडली आहे. त्यामुळे बंदरातील गजबजलेल्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहन चालक नियमांचे पालन न करता आपली वाहने बेधडकपणे रस्त्यावर उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण करणारी वाहने हलविण्यास व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास वाहतूक पोलीस यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांनी पुढाकार घेऊन टोचन गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी न्हावा शेवा वाहतूक पोलीस शाखेतर्फे करण्यात येत आहे. जेएनपीटी बंदरात दरदिवशी मालाची ने-आण करण्यासाठी हजारो वाहनांची रेलचेल रस्त्यावर सुरू असते. त्यामुळे एखादे अवजड वाहन रस्त्यावर बंद पडले तर त्या वाहनाना बाजूला सारून ठेवण्याचे काम हे न्हावा शेवा वाहतूक शाखेसाठी जेएनपीटी बंदरानी देऊ केलेली टोचन गाडीच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा करत आहेत. परंतु गेली तीन महिने सदर टोचन गाडी बंद पडल्याने रस्त्यावर बंद पडणारी अवजड वाहने हलविण्यास अडचणी येत आहेत. तसेच काही वाहन चालक त्याचा फायदा उठवून आपली वाहने बेधडकपणे रस्त्यावर उभी करतात, अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.तरी जेएनपीटी बंदर प्रशासनाने न्हावा शेवा वाहतूक पोलीस शाखेसाठी नवीन टोचून गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी न्हावा शेवा वाहतूक पोलीस शाखेतर्फे जेएनपीटी बंदराकडे करण्यात आली आहे.

Exit mobile version