। रोहा । प्रतिनिधी ।
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर न्हावे ते पनवेल या बससेवेचा शुभारंभ न्हावे सरपंच राजश्री न्हावकर यांच्या हस्ते करण्यात आला. चणेरा, कोकबन परिसरात राहणार्या नागरिकांना या सेवेचा फायदा होणार आहे. चणेरा मार्गावर सकाळच्या वेळेत धावणारी खैरेखुर्द बोरीवली ही सेवा उत्पन्न नसल्याने बंद करण्यात आली होती. यामुळे सकाळच्या सत्रात रोह्याकडे येऊ इच्छिणार्या प्रवाशांची एसटी अभावी गैरसोय होत होती. या नवीन बस सेवेमुळे या विभागातील प्रवाशांना चांगला लाभ होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सदर बससेवा सुरू करण्यासाठी शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, जिप सदस्य आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रवाशांना दिलासा! न्हावे ते पनवेल बससेवा सुरु
