| पनवेल | प्रतिनिधी |
अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्हयाची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून पनवेल पोलिसांनी जेरबंद केले. समाज माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल 3 लाख 25 हजार 500 रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरिन सायबर गुन्हेगारांकडून एक महिन्यापूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्याअनुषंगाने या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली.







