। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा येथे शेतकरी कामगार पक्ष युवा चषक आयोजित नाईट अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाशझोतात खेळविण्यात येणार्या या स्पर्धेचा शुभारंभ शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
याप्रसंगी जि.प. सदस्या भावना पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशितील क्रिकेटरसिकांनी सामने पाहण्यासाठी गर्दी केली होती.