अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व रणसंग्राम क्रीडा मंडळ, नागावच्या संयक्त विद्यमाने आयोजित कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. या वेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नागाव ग्रा.पं सदस्य मंजुषा राणे, मंदार वर्तक आदी मान्यवरांसह रणसंग्राम क्रीडा मंदळाचे सदस्य उपस्थित होते.
