अलिबागमध्ये होणार नाईट टेनिस क्रीकेट स्पर्धा

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा पुढाकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 13 जानेवारीला या स्पर्धा क्रीडा भुवन येथे होणार आहेत. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

अलिबाग तालुका मर्यादित स्पर्धा असून संघ नोंदणी 25 डिसेंबरपर्यंत असणार आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाकडून 45 हजार रुपये प्रवेश शुल्क घेतले जाणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा संघ अलिबाग चॅम्पीयन ट्रॉपीचा मानकरी ठरणार आहे.त्या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतूर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वेात्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकाविराला दुचाकी देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याबाबत सोमवारी सायंकाळी शेतकरी भवन येथे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

Exit mobile version