निलेश चांदोरकर पीएचडी प्रदान

| मुरूड । वार्ताहर ।
निलेश देवीदास चांदोरकर यांना ठाणे वनवृत्तातील वनांवर वनहक्क कायदा 2006 चा झालेला परिणाम या विषयावर केलेल्या संशोधनाबद्दल कुरुक्षेत्र विद्यापिठ कुरुक्षेत्र, हरियाणा येथे पीएचडी पदवीने एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास डॉ. नरेश भार्गव, डॉ.श्री धर्मपाल शास्त्री, देवेन्द्र, दिलीप खोत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.चांदोरकर यांची या विषयावर दोन पुस्तके, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. याच विषयावरील तिसरे पुस्तकू या कार्यक्रमात डॉ. नरेश भार्गव, यांच्या हस्ते करण्यात आले. चांदोरकर यांनी फणसाड वन्यजीव अभयारण्य अभयारण्य मुरुड-अंजिरा तसेच वनविभागी तील सर्वच विभागात मागिल पंधरा वर्षे सेवा केलेली आहे. श्री निलेश चांदोरकर यांचे विविध विषयां वरील संशोधन, माहीतीपर लेख यापूर्वी विविध स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत.

Exit mobile version