सानपाडाच्या निलेश कचरेची सामाजिक बांधिलकी
| पनवेल | वार्ताहर |
संपूर्ण देशात महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला. या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा 2023 या योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घोषित 267 ठिकाणे स्वच्छतेसाठी प्रशासनाने निवडली होती.
सानपाडा येथील असे एक अडगळीत पडलेले दुर्लक्षित ठिकाण होते. त्याची नोंद पालिकेने निवडलेल्या ठिकाणांमध्ये नव्हती. त्या ठिकाणी निलेश कचरे या युवकाने स्वखर्चाने स्वच्छता साहित्य खरेदी करून संपूर्ण आठ तास एकटा राबून ते ठिकाण संपूर्ण स्वच्छ केले. ही एक आदर्श कृती त्यांनी केल्याने त्याचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, आयुक्तांनीदेखील दखल घेतली आहे.
स्वच्छतेची गरज असणारी अशी अनेक सार्वजनिक ठिकाणे आजही आहेत. परंतु मनपा अधिकाऱ्यांनी निवडली नाहीत. असेच एक ठिकाण म्हणजे सानपाडा विभागातील रेल्वे स्थानक जवळ असलेले प्रशस्त शासकीय पार्किंग ठिकाण. या ठिकाणी सगळ्यात जास्त बिकट परिस्थिती होती. येथे दारूच्या, बियरच्या बाटल्या,कचरा,प्लास्टिक,पावसाळी वाढलेले गवत, नागरिकांनी टाकलेला डेब्रिज यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होते. याचा विचार करत निलेश कचरे यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून स्वच्छतेस प्रारंभ केला. त्यानंतर पाच वाजेपर्यंत तीन ठिकाणी कचरा जमा केला. तो कचरा तीन घंटागाड्या भरतील इतका विविध प्रकारचा कचरा जमा होता. दरम्यान, शासनाने फक्त एक तास सांगितला असला तर संपूर्ण दिवस श्रमदान करणार असून महापालिकेच्या दुर्लक्षित असलेल्या ठिकाणी स्वच्छता केले असल्याचे सांगितले
मी सगळ्यात गलिच्छ ठिकाण निवडण्यात आले. सुरुवातील बऱ्याच अडचणी आल्या परंतु पुज्य बापू यांना आदरांजली वाहण्यासाठी अशी संधी परत भेटणार नव्हती. श्रमदानतून देशाची सेवा घडत आहे याचा सार्थ अभिमान आहे.
निलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ता







