निलेश राणे करणार शिंदे शिवसेनेत प्रवेश

| कुडाळ | प्रतिनिधी |

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (दि. 23) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले.

गेले अनेक दिवस निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. 2019 ला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या सोबत ते भाजपमध्ये आले होते. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले. पक्ष हितासाठी जे करता येईल ते करणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहणार असल्याचे राणे म्हणाले.
माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता. मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. निलेश राणे उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे तसा आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आहे. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना यायचं आहे ते येणार असल्याचे राणे म्हणाले. कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. मी लहान कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढायची असल्याचे राणे म्हणाले.

Exit mobile version