महाड न्यायालयाचा निर्णय
महाड । भारत रांजणकर /जुनेद तांबोळी |
पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत महाड न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अवमान कारक उद्गार काढल्याने अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाड येथील विशेष न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. नारायण राणे यांच्याबाबत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून त्यांची जामीनावर सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्या
पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत महाड न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत अवमान कारक उद्गार काढल्याने अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाड येथील विशेष न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. नारायण राणे यांच्याबाबत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या दरम्यान, नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात आल्याने मोठ्या संख्येने महाड मध्ये भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. अनुसूचित प्रकार घडु नये म्हणुन मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित आहेत. राणे यांचे मोठे सुपत्र निलेश राणे पण सोबत हजर आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जामिनावर महाड येथे विशेष न्यायालयात सूनावणी सुरू असून राणे यांच्या पत्नी नीलम राणे तसेच माजी खासदार निलेश राणे हे देखील उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अवमान कारक उद्गार काढणाऱ्या नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या जामिनावर महाड येथे विशेष न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. राणे यांनी काढलेले उद्गार कोणाच्या सांगण्यावरून काढणे याची माहिती मिलणे आवश्यक असल्याने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर नारायण राणे यांच्या वकिलाने आक्षेप घेत कोणतीही पूर्व सूचना न देता अटक करण्यात आल्याचे सांगत जामीन देण्याची मागणी केली होती.
निलम राणे यांच्या सह नितेश राणे महाड कोर्टात दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जामिनावर महाड येथे विशेष न्यायालयात सूनावणी सुरू असून राणे यांच्या पत्नी नीलम राणे तसेच माजी खासदार निलेश राणे हे देखील उपस्थित राहिले आहेत. नारायण राणे याना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राणे यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या
सरकारी वकिलांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अवमान कारक उद्गार काढणाऱ्या नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामिनावर महाड येथे विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राणे यांनी काढलेले उद्गार कोणाच्या सांगण्यावरून काढणे याची माहिती मिलणे आवश्यक असल्याने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. तर नारायण राणे यांच्या वकिलाने आक्षेप घेत कोणतीही पूर्व सूचना न देता अटक करण्यात आल्याचे सांगत जामीन देण्याची मागणी केली आहे.