वावे गावच्या हद्दीत नीलगायीचे दर्शन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि जंगल परिसरात टोरंट प्रकल्पासाठी प्रचंड जंगलतोड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्राणी अन्यत्र आपल्या निवाऱ्यासाठी जंगल शोधत असून, नीलगाय आणि त्याचे पिल्लू उल्हासनदी लगत असलेल्या वावे गावाच्या हद्दीत दिसून आले.

भीमाशंकर अभयारण्य मध्ये सुरू असलेल्या जंगलतोड यामुळे पक्षी- प्राणी यांनी स्थलांतरण करण्यास सुरुवात केली आहे. या जंगल तोडीचा सर्वाधिक मोठा फटका प्राणी आणि पक्षांना बसत आहे. त्यात अनेक ठिकाणी चांगले जंगल आणि वनसंपदा असलेले ठिकाणी पाणी स्थलांतरण करीत आहेत. त्यातील एक नीलगाय टोरंट धरणासाठी जंगल तोडलेल्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदी परिसरात पोहचली आहे. वावे गावच्या हद्दीत सायंकाळी नीलगाय आणि त्याचे बछडा दिसून आले. भाताच्या शेतात ही नीलगाय दिसून आल्याने अनेकांनी ती नीलगाय आपल्या शेतात जाऊन भाताच्या पिकाचे नुकसान करणार नाही याची काळजी घेत होते. मात्र, रात्री त्या नीलगाय ने भाताच्या शेतात प्रवेश करून नुकसान केल्याने शेतकरी रात्रभर नीलगाय शोधत होते.
दुसरीकडे नीलगाय सारखे असंख्य प्राणी पाली सायडोंगर येथील जंगलाच्या बाहेर पडल्याने प्राणीमित्र प्रचंड त्रस्त आहेत.

Exit mobile version