46 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
तहसीलदार कार्यालयाची माहिती
। पेण । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यात शनिवार दि. 18 मे रोजी कोरोनाच्या 9 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत तालुक्यातील 46 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पेण तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आतापर्यंत पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 485 झाली आहे. यापैकी 336 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 14 हजार 103 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 46 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.