| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेले सात पर्यटकांचा काळ आला होता, पण वेळ आली नसल्याने सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडणाऱ्या सात पर्यटकांना वाचविण्यात यश आले.
पुणे येथून सूर्यकांत शिंदे, रोहित गाडगे, सतीश भुजबळ, अपेक्षा शिंदे, कावेरी भुजबळ आणि अजून दोन जण अलिबाग येथे पर्यटनास आले होते. सकाळी साडे अकरा वाजता सात ही पर्यटक अलिबाग समुद्रावर आले होते. यावेळी समुद्र स्नानाचा मोह त्यांना आवरला नाही. मात्र समुद्राला भरती सुरू झाल्याने सात ही जण बुडू लागले. यावेळी बंडया सारंग, दिपक ढोले, जतेश सारंग, अमित पेरेकर, सचिन खोत, अबू, बबन भगत यांनी समुद्रात उड्या मारून त्याचे प्राण वाचविण्यात योगदान दिले