उरण तालुक्यात नऊ उपसरपंच बिनविरोध

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका सोमवारी (2) पार पडल्या. सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत 9 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर 9 ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक घेण्याची पाळी आली होती. यामध्ये सारडे ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचांच्या कास्टिंग मतांवर उपसरपंचपदी उमेदवाराची निवड झाली.

उपसरपंच विजयी उमेदवार
पाणजे – विलास पाटील, डोंगरी – अभिषेक घरत, घारापुरी – बळीराम पद्माकर ठाकूर, रानसई – सुरेश पारधी, पुनाडे – उषा तांडेल, सारडे – जीवन पाटील, नवीनशेवा – कुंदन भोईर, धुतुम – कविता पाटील, करळ – मेधा ठाकूर, कळंबुसरे – सारिका पाटील , बोकडविरा – गौरव ठाकूर, वशेणी – जयंत मनोहर म्हात्रे, पागोटे – सुजित तांडेल, पिरकोन – राजश्री म्हात्रे, जसखार – प्रणाली म्हात्रे, चिर्ले – राजन घरत, भेंडखळ – संगीता भगत, नवघर – दिनेश वसंत बंडा

Exit mobile version