| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील यांची पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भिंगारच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेत दीपक पाटील यांचे अभिनंदन व सत्कार केला. याप्रसंगी रायगड जिल्हा रस्ते आस्थापना संघटक संजय तन्ना, विजय ठाकूर शाखाध्यक्ष भातान व अन्य सहकारी उपस्थित होते. रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, संदेश ठाकूर यांनीदेखील फोन करून दीपक पाटील यांचे अभिनंदन केले.