। नाशिक । प्रतिनिधी ।
बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील बेंदमळा भागात ही दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी (दि. 05) रात्री रात्री नऊच्या सुमारास प्रफुल्ल तांबे (9) हा वडिलांबरोबर लघुशंकेसाठी घराबाहेर आला होता. त्यानंतर घरात जात असताना अचानक बिबट्या आला आणि त्याला ओट्यावरून उचलून शेतात नेले. त्याच्या वडिलांनी आरडाओरड केली असता घरातील लोकांसह बाजूचे लोक जमा झाले. सर्वांनी शोध घेतला असता प्रफुल्ल एका ठिकाणी आढळला. मात्र तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू
