| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) रायगडच्या वतीने 46 वा स्थापना दिन नवी मुंबई येथील भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्टार युनियन डाय-इची लाइफ इन्शुरन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन कुमार उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उद्योग क्षेत्रात सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे नेतृत्व एनआयपीएम रायगडचे अध्यक्ष किशोर शेळके यांनी केले. त्यांना पोपट भोसले, अक्षता म्हात्रे, प्रवीण करकरे आणि डॉ. समीर शेख यांनी सहकार्य केले. यावेळी मानव संसाधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तृप्ती पवार आणि डॉ. कुलदीप भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. कुलदीप भालेराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारती विद्यापीठाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. विलासराव कदम, संचालिका डॉ. अंजली कळसे आणि अध्यक्ष किशोर शेळके यांचे आभार मानले. तसेच अक्षता म्हात्रे, डॉ. समीर शेख, एम. एम. शहाणे, प्रवीण करकरे, श्रेया गुप्ता, शुभम जंगम आणि प्रियांशु विश्वकर्मा यांच्या उत्कृष्ट टीमवर्कचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास एनआयपीएम रायगडचे सदस्य, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तसेच व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ज्ञानविनिमय आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हा कार्यक्रम एक प्रभावी व्यासपीठ ठरला.
एनआयपीएम रायगडचा स्थापना दिन साजरा
