| कोलाड | वार्ताहर |
2023-2024 या शैक्षणिक वर्षातील सीबीएसई दहावी व बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून रोहा तालुक्यातील जे.एम.राठी इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज या शाळेचा निकाल चांगला लागला आहे. जे.एम.राठी इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेजने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
रोहा तालुक्यातील जे.एम.राठी इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेजमधील विद्यार्थी निरज महादेव सरसंबे याने 98.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक सिया संदीप सरफळे 96.80 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या शाळेत तृतीय क्रमांक अनुष्का सतीश पवार 94.80 टक्के, चतुर्थ क्रमांक आनंद संदीप जाधव 93.20 टक्के, पाचवा क्रमांक अभिनव धनंजय गुरव 92.40 टक्के गुण याने गुण मिळवून यश संपादन केले आहे.
बारावी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक अंशु दिपक माने 91.20 टक्के, द्वितीय क्रमांक जीवन टॉम जाकॉब 87.80 टक्के, तृतीय क्रमांक जान्हवी अनिल निपाणे 85.80 टक्के, चतुर्थ क्रमांक प्रथमेश बाळासाहेब गायकवाड 85.40 टक्के, पाचवा क्रमांक जान्हवी राजेश थोरे 84.20 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
बारावी वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक हर्ष किशोर तावडे 87.80 टक्के, द्वितीय क्रमांक मनील मनोज बोराणा 76.20 टक्के, तृतीय क्रमांक शृंगार राजेश मौर्या 73.80 टक्के व गौरव सुरेश बोराणा 73.80 टक्के, चतुर्थ क्रमांक शुभ निलेश गुप्ता 67 टक्के, पाचवा क्रमांक अर्थव अजय तावडे 60.40 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक लीना डेव्हिड, उपमुख्याध्यापक दिपक माने यासह शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.