पनवेलमध्ये अंनिसची निर्भय रॅली

| पनवेल | प्रतिनिधी |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा नऊ वर्षांपूर्वी 20 ऑगस्ट रोजी निर्घृण खून करण्यात आला. मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार आजही सापडलेला नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी निर्भय रॅली काढण्यात आली होती.

विचारवंतांचा खून करून विचार संपत नाहीत ही निर्भयता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निषेध रॅलीमध्ये राष्ट्र सेवा दल, स्नेहकुंज व समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, वडाळे तलाव, सावरकर चौक, जयभारत नाका, कापड गल्ली, भाजी मार्केट, शिवाजी महाराज चौक या मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर पनवेल तहसीलदार कार्यालयाला मुख्यमंत्र्यांच्या नावे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात होणार्‍या दिरंगाईबाबतचे निवेदन कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.

Exit mobile version