निर्मला नागावकर यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथील रहिवासी निर्मला गोविंद नागावकर यांचे शनिवार (दि.19) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. कै. निर्मला नागावकर यांच्या पार्थिवावर कामार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचे दिवसकार्य सोमवार (दि.28), तर उत्तरकार्य दि.1 डिसेंबर रोजी कामार्ले येथील राहत्या घरी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version