। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील जांभुळपाडा येथील रहिवासी भजन सम्राट बाळाराम पाटील यांच्या पत्नी व संगित शिक्षक मनोहर पाटील यांच्या आई निर्मला पाटील यांचे सोमवारी (दि.27) ऑक्टोबर रोजी वयाच्या 79 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी (दि.29) जांभुळपाडा येथे अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. निर्मला पाटील या सुस्वभावी व प्रेमळ वृत्तीच्या होत्या. त्यांनी आपली मुले व नातवंडे यांना चांगले शिक्षित करून सुसंस्कृत केले होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुना, पुतणे, नातवंडे व मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशक्रिया (दि.5) नोव्हेंबर रोजी तर उत्तरकार्य (दि.7) नोव्हेंबर रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







