मुंबई चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्याचे खत

| घाटकोपर | वार्ताहर |
मुंबई शहरात गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले. यावेळी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे निर्माल्य पासून खतनिर्मिती हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सात हजार पाचशे श्रीसदस्यांनी मुंबईतील गिरगाव आणि जुहू चौपाटी येथील विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे निर्माल्य जमा केले. भाविकांनी देखील प्रतिष्ठानच्या या मोहिमेस प्रतिसाद देत आपल्या जवळील निर्माल्य मोठ्या संख्येने श्रीसदस्यांकडे जमा केले.

डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गिरगाव आणि जुहू चौपाटी येथे खत निर्माण करणारे यंत्रही बसवण्यात आले होते. स्वयंसेवकांनी यावेळी निर्माल्या मधील फुले व हारां मधील धागा दोरा काढून फक्त फुले, पाने यंत्रामध्ये टाकत होते. त्याद्वारे फुलांचा चुरा करून ते गोण्यामध्ये भरण्यात येत होते. यांपासून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे . खत निर्माण झाल्या नंतर प्रतिष्ठानने ज्या ठिकाणी वृक्षारोपणचे कार्यक्रम राबवले तेथील झाडांसाठी या खतांचा वापर केला जाणार आहे. निर्माल्य पासून खतनिर्मिती या उपक्रमामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत मिळत असल्याचे प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी माहिती देताना सांगितले.

Exit mobile version