| नवीन पनवेल | वृत्तसंस्था |
यापूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाला लोखंडी रॉडने ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी कृष्ण भगवान साळवी (36 राहणार आझाद नगर झोपडपट्टी, पनवेल, रेल्वे रोड) याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप भगवान साळवी यांचा भाऊ कृष्ण भगवान साळवी यांनी प्रदीप सोबत यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने मंगळवारी (दि.27) घराचा दरवाजा आतमधन लावून घेतला आणि घरामध्ये असलेल्या लोखंडी रॉडने प्रदीप यांच्या डोक्यात आणि दोन्ही हातावर मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याचे हाड आणि डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कृष्ण साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.