निशांत कुळकर्णी सैन्यदलात रुजू

। रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचा सुपुत्र लेफ्टनंट निशांत प्रद्युत कुळकर्णी याने नुकतेच त्याचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले व भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण जे.एम.राठी या शाळेतून पूर्ण केले असून महाविद्यालयायीन शिक्षण घेतले सर्विसेस प्रीपरेटरी औरंगाबाद येथून पूर्ण केले.

निशांत यांस लहानपणापासूनच सैन्यदलात भरती होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने एनडीएमध्ये प्रवेश घेतला.एनडीएमधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून भारताच्या सैन्यदलात आर्मड रेजिमेंटमध्ये ऑफिसर पदावर त्याची निवड झाली आहे. रोहा शहर व तालुक्यातून निशांत कुळकर्णी याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version