नेरळची नीता राठोड रग्बीच्या महाराष्ट्र संघात

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेल्या विद्या मंदिर मंडळाच्या मातोश्री सुमती चिंतामण टिपणीस कला-महाविद्यालयात नीता राठोड या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्याच्या रग्बी संघात स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय रग्बी चॅम्पियनशिप साठी नीता राठोडची निवड झाली असून उडीसा राज्यात हि राष्ट्रीय स्पर्धा झाली त्यात महाराष्ट्र राज्याच्या संघ उपविजेता ठरला आहे. नेरळ ममदापुर येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालयमध्ये कला शेहत पहिल्या वर्षात शिकणार्‍या नीता राठोड हि येथील क्रीडा क्षेत्रातील तुटपुंज्या सोयीसुविधा वर मात करीत तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत होती. त्यातून स्वतः मेहनत घेऊन नीता राठोड या क्रीडापटू विद्यार्थिनीने आपल्या खेळाच्या जोरावर महाराष्ट्र रग्बी असोसिएशनची मने जिंकली आणि महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय पातळीवर रग्बी या संघात निवड झाली आहे. भुवनेश्‍वर उडीसा येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक प्रकारात रौप्यपदक प्राप्त मिळवले. राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या उपविजेते पदाच्या वाटचालीत नीता राठोड या खेळाडूचा मोठा सहभाग राहिला आहे. तिच्या या यशात महाविद्यालयाचे स्पोर्ट इन्चार्ज प्रा. दुर्राझ टीवाले आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. केशव पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

Exit mobile version