राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत निता राठोडला रौप्य पदक

। नेरळ । वार्ताहर ।

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे संपन्न झाल्या. त्यात महाराष्ट्र राज्याच्या रग्बी संघाला रौप्यपदक मिळाले आहे. या रौप्यपदक विजेत्या संघात नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची निता राठोड ही सदस्य होती. जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनची खेळाडू असलेल्या निता हीचा राष्ट्रीय स्पर्धेत रग्बी संघाच्या रौप्यपदक कामगिरीत मोठा सहभाग होता. तिच्या यशाबद्दल कौतुक होत असून प्रशिक्षक प्रा केशव पवार यांचे देखील कौतुक होत आहे.

Exit mobile version