| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
उझबेकिस्थान येथे होणार्या आशियायी स्पर्धेसाठी 18 वर्षाखालील रग्बी संघाची निवड होणार आहे. या शिबिरासाठी कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील व सायली पाटील यांची निवड झाली आहे. हे शिबीर भुवनेश्वर (ओडिशा) येथे 13 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
18 ते 19 सप्टेंबरदरम्यान ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे होणार्या आशियाई भारतीय मुलींचा रग्बी संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रग्बी इंडिया यांनी देशभरातून 54 महिला खेळाडूंची निवड केली आहे. या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या वैष्णवी दत्तात्रय पाटील व सायली सतीश पाटील या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.