। मुंबई । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. नितेश राणेंच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. याबाबत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत बुधवारी (दि. ९) 11 वाजता निर्णय सुनावण्यात आला असून त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.