नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना पदाधिकारी संतोष परब प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आम.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून सोमवारी फेटाळण्यात आला आहे. हा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायाकडूनही नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे. दरम्यान नितेश राणेंवन साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Exit mobile version