। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
नितीन रामचंद्र पाटील आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपली सेवा 37 वर्षे 2 महिने 11 दिवस एवढी करून ते शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत झाले. शालेय जीवनात असताना सुंदर हस्ताक्षर, गोड आवाज आणि सर्वांशी आदराने वागणार्या नितीन पाटील आरोग्य खात्यामध्ये वाहन चालकाची नोकरी स्विकारून सेवा निवृत्ती पर्यंत विना अपघात उत्कृष्ट सेवा केली. 9 जानेवारी 1985 साली आरोग्य खात्यात रुजू झाल्यानंतर प्रथम अलिबाग नंतर पनवेल त्यानंतर पुन्हा अलिबाग येथे बदली झाली. नितीन पाटील यांच्या सेवा काळात देवी निर्मूलन, नारु निर्मूलन, कुष्ठरोग निर्मूलन तसेच पल्स पोलिओ निर्मूलनच्यावेळी उत्तम सेवा दिली. नितीन पाटील यांच्याकडे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लससाठा वाटप करण्याचे काम आले तेही त्यांनी चांगल्या प्रकारे केले. कोव्हिड 19 च्या काळात वाहन चालकांची कसोटीच होती. संपुर्ण सेवा काळात त्यांच्या पत्नीची साथ मोलाची होती. सेवानिवृती या दिवशी अनेक अधिकारी वर्ग, मित्र परिवार, नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.