रमेश मोरे यांची ग्वाही
| माणगाव | प्रतिनिधी |
आपल्या गावातील जी-जी विकासकामे सांगाल, ती सर्व कामे पूर्ण करण्याची माझी जबाबदारी राहील, असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिले. निवाची नळेफोडी गावातील कनकाई माता मंदिराच्या वर्धापनदिनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
माणगाव तालुक्यातील निवाची नळेफोडी येथे बुधवार, दि. 10 मे रोजी काळकाई माता मंदिराचा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी निवाची नळेफोडी गावाला भेट देऊन येथील काळकाई मातेचे दर्शन घेतले. यावेळी आई कनकाई सामाजिक संस्था होडगाव कोंडचे संस्थापक सुशील कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव नवनिर्वाचित संचालक स्वप्नील दसवते, कुमशेत ग्रामपंचायत सदस्य राकेश पातेरे, सामाजिक कार्यकर्ते जयदीप कडू, मंगेश कडू, गणेश दबडे, शंकर खाडे, मोहन खाडे, शिवाजी म्हस्के, होडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीराम बाळू खाडे, गणेश बडवे, विलास भिवंडी, शैलेश भुवड, भागोजी बडवे, गोपाळ बडवे, राजू चाचले, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष योगेश महाडिक, कल्पेश महाडिक, मुंबईकर मंडळाचे सल्लागार सुभाष महाडिक, उपाध्यक्ष विजय महाडिक, दगडू महाडिक, दगडू बाटे, विश्वास बागवे आदींसह निवाची नळेफोडी ग्रामस्थ, महला मंडळ, युवक मंडळ, मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.