चालकाचा पाय फ्रॅक्चर
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
एनएमएमटी बसचा नवीन पनवेल आदई तलावाजवळ अपघात झाला असून या अपघातात चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.
16 ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास 59 क्रमांकाची एनएमएमटी बस क्रमांक एम एच 43 पी 9862 ही खांदेश्वर ते नवीन पनवेल अशी जात होती. बस नवीन पनवेल आदई तलावाजवळ आली असता बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे बस तलावाजवळील फुटपाथवर चढली. तलावाचे पाणी आणि बसमध्ये थोडेच अंतर शिल्लक होते. चालकाने ब्रेक दाबला नसता तर बस थेट पाण्यात गेली असती. सुदैवाने या बसमध्ये दोन ते तीन प्रवासी होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात बसचालकाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे.