पेणमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही

तलाठ्याच्या पंचनाम्यानंतरही तहसिल कार्यालयाचा कानाडोळा
। पेण । वार्ताहर ।

पेण शहर आणि परिसरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तलाठ्यांनी पंचनामा करुनही तहसिल कार्यालयाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षतेमुळे इतिहासाचा ठेवाही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.
पेण शहराच्या सभोवताली मोठया प्रमाणात अनाधिकृत रित्या भरावाची कामे सुरू आहेत. मात्र पेण तहसिलदारांचे त्याकडे सक्षंम दुर्लक्ष होत आहे. सदर भरावांच्या बद्दल पेण तलाठ्यांशी संपर्क साधला असता. त्यांनी पेणच्या आजू बाजूला झालेल्या अनधिकृत भरावाचे पंचनामे करून वरिष्ठांकडे पाठविले आहेत.तसेच खास करून भोगावती पुलाच्या तीरावर झालेल्या भरावाचा देखील पंचनामा केला असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी भोगावती पुलावर जाउन पहाणी केली असता जो भराव झालेला आहे तो भराव मोठया प्रमाणात झाला असून काही प्रमाणात नदीत देखील भराव झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्याच प्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून भुंडया पुलावर जाण्यासाठी पूर्वपार रस्ता (गवण) होती. या रस्त्यांनी सहज रित्या बैलगाडी जात असत.आणि जुन्या नकाशामध्ये आज ही या गवणीचा उल्लेख आहे. ती कुणाच्या मालकीची नसून वहिवाटीची व रहदारीची होती.
महत्वाची बाब म्हणजे स्वातंत्रपूर्व काळात ज्या वेळेला कापुर बागेत मीठाच्या सत्याग्रहासाठी बैठक बोलावली होती त्या वेळेला स्वातंत्र सैनिकांनी याच गवणीचा उपयोग केल्याचे दाखले आजही इतिहासात आहेत. मात्र लक्ष्मी दर्शनाने हुरळून गेलेल्या दोन वर्षासाठी अधिकारी म्हणून येणार्‍या व्यक्तींना पेणच्या इतिहासाचे काही पडले नाही. या गवणीत देखील मोठया प्रमाणात भरावा टाकून गवण बंद करण्यात आलेली आहे. भरावाच्या उंचीचा विचार करता 15 ते 20 फूटांची उंची असून एक ते दिड एकरात भराव झालेला आहे. याच्या स्वामित्व कराचा विचार करता लाखो रुपयांचा स्वामित्व कर भरावा लागणार. हा भरला आहे की नाही ती ही माहिती उपलब्ध होत नाही. तसेच पशुसंर्वधन कार्यालयाच्या समोर ज्याप्रमाणात भराव झालेला आहे ते पाहता एकतर पेणचे महसुल अधिकारी झोपलेले आहेत अथवा झोपेचे सोंग घेत आहेत की राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच एवढया मोठया प्रमाणात भरावा सुरू असताना ती बाब दिसत नाही. हे न पटण्यासारखे एक कोडे आहे.

Exit mobile version