अलिबाग तालुका कोरोनामुक्त; एकही रुग्ण नाही

तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात बुधवार दि. 23 मार्च रोजी कोरोनाच्या एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही तर उपचार सुरू असलेला एकमेव रूग्ण देखील आज पूर्णपणे बरा झाल्याने त्याला कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यात एकही विद्यमान रूग्ण नसल्याने अलिबाग तालुका कोरोना मुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 239 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, 22 हजार 610 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील एकाही पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु नसल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एकही रूग्ण तालुक्यात नसला तरी संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्व भूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगत सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version