महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही ; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची उर्जामंत्र्यांची माहिती

।भुसावळ । वृत्तसंस्था ।
कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट वीजेचे कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे असे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.
महावितरणने सुद्धा त्यांची एकूण वीजेची मागणी 18,123 मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी 20,870 मेगावॅट सायंकाळी पिक डिमांड पूर्ण केले आहे. महानिर्मितीने वीज उत्पादनामध्ये उत्तम समन्वय राखल्याने कोळश्याची आवक वाढली. वीज उत्पादन वाढूनसुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा आहे. भुसावळ येथे वीज उत्पादन संच सुरु करण्यात आल्याने वीजेमध्ये अधिकची भर पडणार आहे, असे राऊत म्हणाले.
कोळसा टंचाई असताना देखील भुसावळ येथील 210 मेगावॅट, चंद्रपूर येथील 500 मेगावॅट, नाशिक येथील 210 मेगवॅट हे संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी तीन संच बंद आहेत. एकूण 27 पैकी सात संच बंद आहेत. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे. पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली होती. ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत आलेली आहे.

सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी (पिक डिमांड) काळात महानिर्मितीने औष्णिक, वायू आणि जल विद्युत केंद्रांतून 8 हजार 119 मेगावाट इतकी वीज निर्मिती करून कोळश्याच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. महावितरणने सुद्धा त्यांची मुंबई वगळता एकूण विजेची मागणी 18 हजार 123 मेगावाट आणि मुंबईसह एकूण मागणी 20 हजार 870 मेगावाट सायंकाळी 7 च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

Exit mobile version