लालपरीचे विलीनीकरण नाहीच!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न मार्गी लावू, असं परब यांनी सभागृहात बोलताना सांगितलं. मात्र, त्यानंतर आता एसटीच्या समितीचा अहवाल समोर आला असून, त्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नसल्याचं समोर आलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला अद्याप यश आलेलं नाही. सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिली आहे. मात्र, अद्याप कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. राज्य सरकारने हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने अखेर अहवाल सादर केला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या अहवालाला मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण आता अशक्य असल्याचं स्पष्ट झालंय. कोर्टात देखील हा अहवाल सादर केला जाणार आहे.

त्यामुळे, विलीनीकरणाचा मुद्दा आणखी पेटणार असल्याचंभयाण वास्तव सध्या दिसत आहे. राज्य सरकारने अद्याप यावर अंतिम निर्णय दिलेला नसला तरीही विलीनीकरण होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कर्मचारी नेमकी काय भूमिका घेतात याकडेच सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Exit mobile version