एसटी संपकर्‍यांना ना काम, ना दाम

परिवहन मंत्री परब यांचा इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ङ्गना काम, ना दाम यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. मात्र या सार्‍या गोंधळादरम्यान एसटी कर्मचार्‍यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली. राज्यामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचसंदर्भात राज यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. मी आत्महत्या करणार्‍यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अटक असेल, असं राज यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचार्‍यांचं प्रतिनिधित्व करणार्‍या मंडळाला सांगितले.

Exit mobile version