| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील अथर्व गाताडी याची भारतीय नौसेनेत अग्निवीर पदावर निवड झाली आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, रायगड विभाग व महाविद्यालय विकास समिती चेअरमन बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे. पाटील, नगराध्यक्षा भावना घाणेकर, सुधीर घरत तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ यांच्याकडून अथर्व गाताडी याचे अभिनंदन होत आहे. अथर्व गाताडी याने रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत घेतलेल्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या जोरावर नौसेना भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीरीत्या पार करून अग्निवीर म्हणून निवड मिळवली. देशसेवेची संधी मिळाल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व संरक्षण दल भरतीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. अथर्व गाताडी यांच्या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.







