चारपैकी एकही ठिकाणी ओबीसी आरक्षण नाही

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
बहुप्रतीक्षित असलेले सुधागड तालुका पंचायत समिती आरक्षण सोडत अखेर जाहीर झाले. पालीतील भक्त निवास क्रमांक एक येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी चारपैकी एकाही ठिकाणी ओबीसी आरक्षण पडले नाही.

सुधागड पंचायत समितीचे 21 जांभुळपाडा व 22 राबगाव असे दोन गट आहेत. त्यामध्ये जांभुळपाडा गटात 41 परळी व 42 जांभुळपाडा हे दोन गण आहेत. परळी गणात सर्वसाधारण आणि जांभुळपाडा गणात सर्वसाधारण (महिला) हे आरक्षण पडले आहे. तर, राबगाव गटात 43 राबगाव व 44 अडुळसे हे दोन गण असून, राबगाव गणात अनुसूचित जमाती (महिला) आणि अडुळसे गणात सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.

या कार्यक्रमास सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वाकडे, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावर, नायब तहसीलदार वैशाली काकडे, गटविकास अधिकारी विजय यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक महमुनी, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, नगरसेवक पराग मेहता, सरपंच नरेश खाडे, संजोग शेठ, सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ, श्री. उमठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जांभुळपाडा गट -सर्व साधारण महिला
राबगाव गट- सर्वसाधारण

Exit mobile version