अद्याप लॉकडाऊनसारखी परिस्थिती नाही – टोपे

पुणे | प्रतिनिधी |
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
जिथे काही प्रॉब्लेम नाहीय तिकडे लॉकडाऊनचा विषय नाही. 40 टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता 10 टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असं टोपेंनी सांगितलं.
केंद्राचा निधी वेगळ्या कामासाठी खर्च करणार
केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत आजच माझी बैठक होती. केंद्राने जो निधी दिलाय तो वेगळ्या गोष्टीसाठी खर्च होणार आहे, आणि तो वेळेत कसा खर्च होईल याकडे आमचं लक्ष आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशाराही त्यांनी दिला होता.

कोरोना निर्बंधाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच – पवार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत चर्चा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. राज्यातही निर्बंधांबाबत जो निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून एकमताने घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version