मालमत्ता कर न भरल्याने कंपन्यांना जप्तीची नोटीस

हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीची कारवाई
| उरण | वार्ताहर |
ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी मालमत्ता करवसुली संदर्भात केलेल्या कारवाईवर M/S, NSICT, ANSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्याकडून ग्रामपंचायतीने दिलेल्या मुदतीत संबंधित कंपन्यांनी मालमत्ता कराची रक्कम ग्रामपंचायतीमध्ये जमा न केल्याने व त्यासंबंधी कोणतेच समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी मालमत्ता करवसुलीसंदर्भात या कंपन्यांवर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस दिलेली आहे.

ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा, ता. उरण, जि. रायगड यांचे पूर्वीचे महसुली गाव शेवा असून, शेवा हद्दीतील कंपन्यांनी केलेल्या बांधकामाचा व मोकळ्या जागेचा मालमत्ता कर वसुलीचा अधिकार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना आहे. त्यामुळे शेवा हद्दीतील एकूण बांधकामापैकी NSICT, NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्यांनी केलेल्या बांधकामावर ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी संबंधित कंपन्यांना दि. 27 डिसेंबर 2021 रोजी मालमत्ता कराचे बिल व त्यानंतर दि. 17 जानेवारी 2022 रोजी मागणीची रीट नोटीस बजावून 30 दिवसांची मुदत दिलेली होती.

Exit mobile version