महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका, वाहनचालकांचा जीव धोक्यात
| दिघी | गणेश प्रभाळे |
दिघी – पुणे महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे पावसाळी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. यावेळी पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसात कुडगाव येथे दरड कोसळली.
वडवली-दिघी मार्गावर कुडगाव रस्त्यावरील पाण्याची टाकी याठिकाणी शुक्रवारी (दि.8) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. मुसळधार पाऊस व त्यात पोखरलेले डोंगर यामुळे मातीच्या ढिगाऱ्यासह मोठी दगड रस्त्यावर आली. दरम्यान,या मार्गावर कोणतेच वाहन जात नसल्यामुळे मोठा अपघात टळला.
दोन दिवस अतिवृष्टीने या मार्गावरील धोका वाढत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक प्रवासी करीत आहेत.